जन आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : डॉ. ओमप्रकाश शेटे

0

आयुष्यमान भारत मिशन योजनेच्या माहितीसाठी 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : एकत्रित प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन आयुष्यमान भारत मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत च्या योजनांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉ.माधव जोशी, डॉ. दीपक वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेच्या डॉ. मंजिरी कुलकर्णी जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर्स व प्रतिनिधी उपस्थिती होते.

डॉ. शेटे पुढे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील एक ही पात्र लाभार्थी शासनाच्या आरोग्य योजना पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे. महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी पात्र ठरतील यासाठी त्यांना सहकार्य करावे. या आरोग्याच्या योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या लोकांमध्ये योजनेविषयी जनजागृती करून त्यांना योजनेचे महत्त्व पटवून दिल्यास एकही रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच जन आरोग्य योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य मित्रांची संख्या वाढविण्यात यावी व आपले 12 अंकी रेशन कार्ड अद्यावत करून घ्यावे. जिल्हा पुरवठा विभागाने रेशन कार्ड अद्यावत करण्यासाठी मदत करावी. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांनी त्यांच्याकडे योजनेअंतर्गत रुग्णांची नोंदणी झाल्यास त्या रुग्णाला तात्काळ सर्व विविध नियमवलीप्रमाणे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. रुग्णालयातील आरोग्य सुविधा व अन्य सुविधाच्या अनुषंगाने योजनेच्या एकाही रुग्णांची अथवा त्याच्या नातेवाईकांची तक्रार येणार नाही याबाबतही रुग्णालयांनी योग्य ती दक्षता घ्यावी असेही डॉ. शेटे यांनी सूचित केले.

सोलापूर जिल्ह्यात एकुण लाभार्थी प्रधानमंत्री एकुण लाभार्थी 11 लाख 58 हजार 758, पिवळे व केसरी रेशन कार्ड लाभार्थी 11 लाख 88 हजार 197, शुभ्र रेशन कार्ड लाभार्थी 16 लाख 65 हजार 697, एकुण लाभार्थी संख्या 40 लाख 12 हजार 652, एकुण आयुष्यमान कार्ड वाटप 10 लाख 43 हजार 671, सोलापूर जिल्ह्यात एकुण आयुष्यमान कार्ड वाटप 26 टक्के झाले असून एकुण आयुष्यमान कार्ड पेंडिंग 29 लाख 69 हजार 41, सोलापूर जिल्ह्यात एकुण आयुष्यमान कार्ड पेंडिंग 74 टक्के आहेत. तरी आयुष्यमान भारत योजनेचे प्रलंबित असलेले सर्वकाळ लवकरात लवकर लाभार्थ्यांना पोहोचतील याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे असे डॉक्टर शेटे यांनी सुचित केले.

प्रारंभी जिल्ह्यात आरोग्य योजनेविषयी झालेल्या कामकाजाची माहिती डॉक्टर जोशी यांनी दिली. या योजनेमध्ये सरकारी रुग्णालयांची एकुण संख्या 7, खाजगी रुग्णालयांची संख्या 57, मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल्सची संख्या 53, एकल विशेष रुग्णालयांची संख्या 11, आरोग्यमित्रांची संख्या 84 इतके असून योजनांचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी यावेळी सांगितले.


आयुष्यमान भारत मिशन योजनेच्या माहितीसाठी 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या