पूर्णा तालुक्यातील लक्ष्मणनगर येथे शासकीय वाळू डेपोला प्रारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण सुरू केले आहे. त्याचा एक भाग म्हणून पूर्णा तालुक्यातील लक्ष्मणनगर येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत शासकीय वाळू डेपोला प्रारंभ झाला.

गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधव बोथीकर, प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी, जायभाये, रवी कवडे, कंत्राटदार प्रवीण अग्रवाल उपस्थित होते.

शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार शासकीय रेती डेपोच्या माध्यमातून सहाशे रुपये प्रति ब्रासप्रमाणे रेती देण्याचे शासनाचे धोरण आहे. या अंतर्गत रेती घाटांचे सर्वेक्षण, पर्यावरण विभागाची मान्यता व निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. तथापि नागरिकांना लवकर रेती उपलब्ध व्हावी, यासाठी नदीपात्रात पाणी असलेल्या रेती घाटाच्या ठिकाणी गाळमिश्रित रेतीघाटातून गाळमिश्रित रेती काढणेबाबत जलसंपदा विभागाकडून आलेल्या शिफारशीप्रमाणे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेनुसार पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथील रेती घाट व लक्ष्मणनगर येथील रेती डेपो पहिल्याच फेरीत लिलावात गेल्याने जिल्ह्यात प्रथमच या ठिकाणी शासकीय रेती डेपोची सुरुवात करण्यात आली आहे.

नागरिकांना 600 रूपये प्रति ब्रास दराने रेती उपलब्ध होणार आहे. नागरिक महा-ई-सेवा केंद्रातून त्यासाठी नोंदणी करून रेतीची मागणी करू शकतात. नोंदणी केलेले नागरिक आपली पावती घेऊन या शासकीय रेती डेपोमधून रेती घेऊन जाऊ शकतात. नागरिकांना प्रत्येकी दहा ब्रास इतकी रेती मिळू शकते. तसेच रेती डेपो पासून घरापर्यंत रेती नेण्याचा खर्च संबंधित नागरिकांनी करायचा आहे. सर्वसामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या