चिंचोली काटी येथे १०१ मोफत गॅस वाटप, राजमुद्रा भारतगॅस एजन्सीचा उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : चिंचोली काटी M. I. D. C. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत १०१ लाभार्थी कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. हे गॅस कनेक्शन ग्राम.चिचोंली काटी येथील सदस्या सौ.अनिता महेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मे.राजमुद्रा भारतगॅस एजन्सी कडून वाटप करण्यात आले.यावेळी मान्यवर बीपीसीएल चे आधिकारी लोकेश मीना सर इतर मान्यवर शिवसेना माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष महेश भोसले(सर), हणमंत भोसले, योगेश भोसले, आनंद व्यवहारे , प्रकाश निळ, विक्रम भोसले, महेश पिंपळे, राजेंद्र भोसले, अभिजीत भोसले, शहाजी भोसले, विष्णू भोसले , गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व महिला भगिनी व लाभार्थी उपस्थित होते.