मांडेगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील जय भीम बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण मांडेगावचे ज्येष्ठ नागरिक दशरथ अंकुश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे गुरुजी होते. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन माजी सरपंच पंडित मिरगणे व उपसरपंच बबन मिरगणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. शशिकांत गायकवाड यांनी उपस्थित सर्व बांधवांना मार्गदर्शन केले. व संविधान याबाबत सर्व माहिती उपस्थितीताना सांगितली. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब सोनवणे उज्वला गायकवाड माजी सरपंच विकास कदम लक्ष्मण मिरगणे सुनील सोनवणे सोमनाथ सोनवणे मंगल सोनवणे महानंदा सोनवणे काजल सोनवणे भामा जावळे व गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा मांडेगाव जय भीम बुद्ध विहार कार्यकारणीचे अध्यक्ष रामलिंग सोनवणे सरचिटणीस कैलास सोनवणे कोषाध्यक्ष राजेंद्र खुरंगुळे यांनी केले होते.