केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरात १४० जणांचे रक्तदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : येथील केसरी शक्ती नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी सुजित पटवारी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जगन्नाथ आदमाने , डॉ आनंद गोवर्धन , पत्रकार आनंदकुमार डुरे , आप्पा दळवी , अण्णासाहेब कुरुलकर ,नाना शिखरे उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नितीन रणदिवे ,मनोज दिक्षित ,प्रकाश कासार ,प्रशांत दीक्षित ,महेश कासार ,सचिन कासार ,संदिप कासार ,दादा गवळी ,बाळू गवळी ,प्रितम रणदिवे ,अमोल कासार ,सचिन रणदिवे , शाहू पवार ,सुधीर मस्के ,अरुण साखरे आदींसह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले .रक्तदान शिबिरासाठी रामभाई शहा रक्तपेढी च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या