मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी साधला ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद
B1न्यूज मराठी नेटवर्क
ठाणे : आनंदाचा शिधा, शिवभोजन, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी बोनस या योजनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील 35 हुन अधिक लाभार्थी सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे, पुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच ठाणे जिल्हयातील योजनाचे लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी ठाणे किसन नगर येथील प्रिती गट्टा यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून योजनेची माहिती घेतली. श्रीमती गट्टा म्हणाल्या की, आनंदाचा शिधा मिळाल्याने आमचे सण ,उत्सव आम्ही आंनदात साजरे करत आहोत. या योजना अशा पुढेही चालू ठेवावेत.
या बैठकीला ठाणे जिल्हयातून आनंदा शिधा योजनेचे 15 लाभार्थी, शिवभोजन योजनेचे 11 लाभार्थी, धान उत्पादन शेतकरी प्रोत्साहन राशी बोनस योजनेचे 10 लाभार्थी उपस्थित होते. महिलांना एसटी बसमधून तिकीटामध्ये 50 टक्के सवलत या योजने बद्दल उपस्थित लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित लाभार्थ्यांशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संवाद साधला.