महानगरपालिका मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : महानगरपालिका मुख्यालयात आज मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, करुणा डहाळे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, मुख्यलेखापरीक्षक उत्तमराव कावडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे, उप अभियंता अनिल गायकवाड, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, स्वीय सहाय्यक दिलीप काठे, वाल्मिक ठाकरे, कृष्णा फडोळ, नितीन गंभीरे, सोनल पवार, प्रदीप नवले, संतोष मुंढे, किशोर जाधव, चंद्रकांत चव्हाण, हुसेन पठाण, विरसिंग कामे, सागर पिठे, पवन वझरे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.