कळंब नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, 15 नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा.नगराध्यक्ष, मा.उपनगराध्यक्ष, 15 नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेना व भाजपा सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ह्याच पक्षप्रवेश मालिकेतील आज कळंब शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व माझ्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे कळंब शिवसेनेची ताकद वाढली असून येत्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणारचं या बाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा सुधीर भवर, यांच्यासह अमर विजय गायकवाड, सुभाष सूर्यभान पवार, इंदुमती जय नंदन हौसलमल, साधना कांतीलाल बागरेचा, संगीता महेश पुरी, सफुरा शकील काझी (सर्व माजी उपनगरअध्यक्ष) लक्ष्मण मनोहर कापसे, मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, मुरलीधर भवर, महेश मिठू पुरी, उत्तरेश्वर बळीराम चोंदे, कांतीलाल मोहनलाल बागरेचा सागर सुभाष मुंडे व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी नितीन लांडगे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. आपणा सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या