फुले आंबेडकर जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समितीकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आज वृक्ष संवर्धन समिती बार्शी कडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आज सकाळी सहा ते नऊ या वेळेत संपूर्ण पुतळा पार्क परिसरची तसेच कोर्ट परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्व कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट देखील लावण्यात आली त्यानंतर सर्व महापुरुषांचे पुतळे गुलाब पाण्याने स्वच्छ करण्यात आले. शेवटी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी प्राचार्य शशिकांत धोत्रे,गौतम आठवले,वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, समाजसेवक सुमित खुरंगुळे तसेच वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या पाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती मार्फत बार्शी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम राबवली जात आहे. हरित बार्शी स्वच्छ बार्शी आणि सुंदर बार्शी या त्यांच्या घोषवाक्या प्रमाणे वृक्ष संवर्धन समितीचे कार्य चालू आहे. मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारे या परिसरात वृक्ष संवर्धन समितीतर्फे स्वच्छता करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देखील मागच्या महिन्यात अशीच स्वच्छता मोहीम श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात समितीच्या माध्यमातून राबविण्यात आली होती. यावेळी प्रा.शशिकांत धोत्रे, उमेश नलावडे, वीरेंद्र बंडे, एड. आनंद मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या स्वच्छता मोहिमेत वृक्ष संवर्धन समितीच्या राहुल तावरे,राणा देशमुख,संतोषकुमार गायकवाड,योगेश गाडे,अक्षय घोडके,चंद्रकांत चोबे,अक्षय भुईटे,योगेश दरूरमठ,चारुदत्त जगताप या सदस्यांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला.