नाथपंथी समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी : जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण

B1न्यूज मराठी नेटवर्क
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ सोलापूर यांच्या वतीने नाथपंथी समाजाच्या विकासासाठी निवेदन
बार्शी : अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ सोलापूर यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास “नाथपंथी समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे व पिवळे रेशन कार्ड सर्वांना देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
नाथपंथी समाजातील (नाथपंथीडवरीगोसावी, डवरी गोसावी, नाथजोगी, जोगी, भराडी, गिरीगोसावी, रावळ तसेच नाथपंथातील सर्व पोट जाती) हा नाथ समाज भटक्या जमातीच्या (NT-B) संवर्गात समाविष्ट आहे. आमचा समाज आदिवासी समाजाप्रमाणे पिछाडलेला असून आमच्या समाजामध्ये गरीबी, रोजगाराचा आभाव व शैक्षणिक सुविधांचा आभाव आहे. तसेच (NT-B) संवर्गातील कोल्हाटी, घिसाड़ी बेलदार व इतर काही जातींना महाराष्ट्र राज्यामध्ये पिवळी शिधापत्रिका दिली जात आहे. तरी नाथपंधी समाजाला वरील जातीप्रमाणे पिवळी शिधापत्रिका मिळावी असे निवेदन नमूद केले आहे.
मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय-सोलापूर येथील महसूल तहसीलदार दत्तात्रय मोहाळे साहेब यांना देण्यात आले. पुढे हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्षनेते- महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय (दादा) चव्हाण, जिल्हासचिव सुरेश जाधव , जिल्हासरचिटणीस नवनाथ साळी, बार्शी तालुकाध्यक्ष काशिनाथ गोसावी, जिल्हासंघटक विश्वनाथ पवार, सहसंघटक लालनाथ चव्हाण, आबासाहेब चव्हाण , केदार पवार व सोमनाथ चव्हाण आदि नाथबांधवांची उपस्थिती होती.
आपला नाथसमाज हा भटक्या जमातीचा (NTB) आहे. यामध्ये आदिवासीप्रमाणे पिछाडलेला,मागास असून त्यांचेवरील मागणीप्रमाणे विकास होण्यासाठी म्हणून अ.भा.ना.स.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जयाजीनाथ साहेबांच्या प्रयत्नांनी माजी मंत्री गणेशजी नाईक महाराष्ट्राच्या विधिमंडळात हा प्रश्न लावून धरल्याबद्दल त्यांचे संघटनेने आभार मानले.