उद्योजक, कारागीर, शेतकऱ्यांनी खादी व ग्रामोद्योगच्या योजनांचा लाभ घ्यावा – राहुल कर्डिले
B1न्यूज मराठी नेटवर्क
खादी व ग्रामोद्योगच्या योजनांचा जनजागृती मेळावा
वर्धा : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्यावतीने पंचायत समिती, आष्टी येथे मंडळाच्या विविध योजनेच्या जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. उद्योजाक, कारागीर, शेतकऱ्यांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसिलदार सचिन कुमावत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चचेरे, आष्टीचे गटविकास अधिकारी प्रदिप चव्हाण यांची उपस्थिती होती.
मेळाव्याच्या उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उद्योजक, कारागीर महिला, शेतकरी यांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले. यावेळी मेळाव्यात लावण्यात आलेल्या उद्योजकांच्या स्टॉलला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले.
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चचेरे यांनी मधकेद्र योजना व मंडळाच्या योजनाची माहिती दिली. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मधकेंद्र योजनेची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी मध केंद्र योजना मंडळाचे मधुक्षेत्रिक आर.पी मनोहरे यांनी मधमाशांच्या वसाहतीची माहिती तसेच उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी रोशन तायवाडे यांनी उद्योजकता विकास विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक श्री. पांडे यांनी मंडळाच्या रोजगार निर्मिती व त्याकरीता आवश्यक असणारी कागदपत्रे व अर्ज करण्याची कार्यपध्दतीवर सविस्तर मार्गदर्शन केले. रोहीत रत्नपारखी यांनी मधपाळ यांनी मधमाशांच्या संगोपणाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आरती दहिवडे यांनी केले तर आभार व्ही. एल.जवादे यांनी मानले.