बार्शीचे अॅड.विवेक गजशिव ‘आंबेडकरी योद्धा’ पुरस्काराने सन्मानित.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अॅड.विवेक गजशिव यांना ‘आंबेडकरी योद्धा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अॅड.विवेक गजशिव यांना हा पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेल्या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाहीफेक करणाऱ्या मनोज गरबडे यांनी पुणे पिंपरी चिंचवड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात केले होते.यावेळी मनोज गरबडे यांनी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना समता सैनिक दलाच्या ९६ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार दिला.यावेळी सोलापूर जिल्ह्यातून अॅड.विवेक गजशिव यांची या पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी अॅड.गजशिव यांना आंबेडकरी योद्धा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्थरातून स्वागत करण्यात आले.गेल्या दहा-बारा वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची हा पुरस्कार पोचपावती असल्याचे गजशिव यांनी सांगितले.