कोरफळे येथे ५ कोटी ९४ लाखांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

0

बार्शी : तालुक्यातील कोरफळे गावात ५ कोटी ९४ लाखांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच कोरफळे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

कोरफळे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जलसंधारण विभाग अंतर्गत येमाई देवी तलाव साठवण तलावात रुपांतरीत करण्यासाठी ४ कोटी १३ लाख,कोरफळे ते येमाई देवी मंदिर रस्त्यासाठी २५ लाख,कोरफळे ते खांडवी रस्त्यासाठी १०लाख,जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ९३ लाख,२५/१५ योजने अंतर्गत कॉंक्रीट रस्त्यासाठी १० लाख, दलित वस्ती योजने अंतर्गत काँक्रीट गटार करणे यासाठी ५ लाख,दलित वस्ती योजने अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे यासाठी ३.५ लाख,दलित वस्ती योजनेअंतर्गत स्मशान भूमी करणे यासाठी १० लाख इत्यादी मंजूर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार कडून तालुक्यातील विकास कामांकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.बार्शी तालुक्यातील गावांकरिता जन-सुविधा योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून, आमदार निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध केला असुन भविष्यातही मोठ्या प्रमाणात निधीसाठी पाठपुरावा करणार आहे तसेच गावच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करावे, विकासाची जबाबदारी माझी असेल त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,गावातील लोकांनी भांडण तंटे विसरून गावच्या विकासासाठी एकत्र यावे,असे झाले तरच खऱ्या अर्थाने गावचा विकास होईल,असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यात कोट्यावधींची विकासकामे चालु आहेत.

यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, रमेश (आण्णा) पाटील, माजी नगरसेवक विलास (आप्पा)रेणके,ज्येष्ठ नेते कौरव माने,माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, सुधीर (बापू) बारबोले, नानासाहेब पाटील, समाधान डोईफोडे, उमेश बारंगुळे,नंदकुमार डोईफोडे, आण्णा सुरवसे, दयानंद गाडे, दत्तात्रय मोरे, वैभव शिंदे,पंडित मिरगणे, इंद्रजित चिकने, संतोष मोरे,यशवंत माने,विनायक घोडके, तात्या वांगदरे, भाऊसाहेब वांगदरे, धनाजी माने,शंकर ढोरे,गौतम जगताप,जयराम टोणगे,औदुंबर वांगदरे, नागा टोणगे,लक्ष्मण लोखंडे, विठ्ठल फरद, अमोल वांगदरे,दादा भोसले,लक्ष्मण लोखंडे,मोसीन आतार, जनक संसारे,विठ्ठल भोसले तसेच इतर प्रमुख मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या