बार्शी तालुक्यातील धानोरे (द) येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून ९६ लाख ४० हजार रुपये मंजूर कामांचे भूमिपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जलजीवन मिशन अंतर्गत उंच पाण्याची टाकी व गावाअंतर्गत पाईप लाईन करणे यासाठी ३८ लाख रुपये,तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत येमाई देवी मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे यासाठी २० लाख रुपये,जि.प. फंडातून धानोरे ते पुरी रस्ता डांबरीकरण करणे यासाठी १५ लाख रुपये,२५-१५ योजनेअंतर्गत गावाअंतर्गत काँक्रीट रस्ते करणे यासाठी १० लाख रुपये,जनसुविधा योजनेमधुन गावाअंतर्गत काँक्रीट रस्ते करणे यासाठी ५ लाख रुपये,डी.पी.डी.सी. योजनेअंतर्गत येमाईदेवी मंदिरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे यासाठी ४ लाख रुपये आदी मंजूर कामांचे भूमिपूजन व जि.प. फंडातून ८.४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जि.प.शाळा नवीन इमारतीचे लोकार्पण बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बार्शी शहर व तालुक्यात शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधींची कामे चालू आहेत व भविष्यातही मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत.यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व सर्व सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.