कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग ; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय
B1न्यूज मराठी नेटवर्क
धंगेकर ११,०४० मतांनी विजयी
३० वर्षानंतर भाजपाला पराभवाचा धक्का
पुणे : गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला कसबा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) रूपाने महाविकास आघाडीने (MVA) भाजपावर (BJP)मोठा विजय मिळविला आहे. धंगेकरांनी ११,०४० मतांनी आघाडी घेतली आहे.धंगेकरांना ७२,५९९ मते मिळाली तर भाजपा उमेदवारास ६१,७७१ मते मिळाली आहेत. कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुक जाहीर झाली. भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासणे यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रूपाने दिसून आली. विजयानंतर धंगेकरांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. कसबा पेठेत धंगेकरांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत आहेत.