कुठे गेल्या स्मृती ईरानी म्हणत, गॅस दरवाढी विरोधात स्मृती ईरानींचे मास्क घालुन सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ केली याच्या निषेधार्थ सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे स्मृती ईरानी यांचे मास्क घालुन कुठे गेल्या स्मृती ईरानी, आज त्याच स्मृती ईरानी असत्या तर बाराशे दर ऐकून वेड्याच झाले असत्या म्हणत निर्दर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतीकात्मक स्वरुपात महिलांनी काँग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरचे दर तीनशे रुपये असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या स्मृती ईरानींचे मास्क घालुन, आज त्याच पूर्वीच्या स्मृती ईरानी असत्या तर मोदींनी दरवाढ केलेल्या गॅस सिलेंडरचा बाराशेचा दर ऐकुन वेडे होऊन नाचले असते असे प्रतीकात्मक पथनाटय सादर केले आणि मोदी सरकारच्या विरोधात गॅस सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अब की बार पाकिटमार सरकार, भाग गई रे भाग गई स्मृती ईरानी भाग गई, चौकीदार चोर है अदानी का यार है, गॅस दरवाढ करून अदानीची नुकसान भरपाई करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, दरवाढ कमी झालेच पाहिजे, अश्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणानुन गेला.यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आधीच प्रचंड महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आज एक जबरदस्त झटका दिला. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ करुन देशातील जनतेच्या खिश्यावर दारोडा टाकला आहे. आपल्या उद्योगपती अदानी आणि इतरांचे लाखो कोटी कर्जे माफ करून त्यांची वसूली गॅस, पेट्रोल, डीझेल, महागाई करून देशातील जनतेकडुन वसुल करत आहे. तसेच उद्योगपती अदानीचे झालेल्या नुकसानीचे भरपाई दरवाढ करून करत आहेत. जनतेला पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ या मोदी सरकारने आणली आहे. म्हणून आज रोजी गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात, महागाई विरोधात, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी, भाजपा आणि स्मृती ईरानी यांनी काँग्रेसच्या काळात केलेल्या आंदोलनाची आठवण करुण देण्यासाठी, गॅस सिलेंडरचे दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचे मुखवटे घालुन निदर्शने आंदोलन केले.यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, नागनाथ कदम, महेश लोंढे, बसवराज म्हेत्रे, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, तिरुपती परकीपंडला, अप्पासाहेब बगले, हारून शेख, भोजराज पवार, नागनाथ कासलोलकर, सोहेब महागामी, नूर अहमद नालवार, संजय गायकवाड, वसिष्ठ सोनकांबले, सुमन जाधव, अरुणा वर्मा, प्रमिला तुपलवंडे, कमरुनिस्सा बागवान, दशरथ गायकवाड, कुणाल गायकवाड, विवेक कन्ना, लखन गायकवाड, इलियास शेख, शकील शेख, बाबुराव क्षीरसागर, माउली जाधव, अंजली मंगोडेकर, शोभा बोबे,शिल्पा चांदने, मुमताज तांबोली, संघमित्रा चौधरी, नागनाथ शावने, मुन्ना वळसंगकर, सुभाष वाघमारे, विवेक इंगळे, VD गायकवाड, चक्रपाणी गज्जम, दीनानाथ शेळके, अनवर शेख, चेतम गोयल, विकास येलेगावकर, नागेश बोमडयाल, रेखा बिनेकर, मनीषा भोसले, प्राजक्ता घाटे, लता सोनकांबले, श्रीकांत दासरी, सुनीता बेरा, चंदू नाईक, शशिकांत शेळके, धीरज खंदारे, बबलु जाधव, महेंद्र शिंदे, आदित्य म्हणाने, किरण राठोड, मनोहर चकोले, सविता सोनवणे, अर्चना गायकवाड़, नीता बनसोडे, चंदा काळे, प्रमिल्स गायकवाड, मुमताज शेख, चंद्रकला निज्मल्लू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या