शिराळे कारखाना स्फोटात मयतास प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे २५ लाख रुपये शासकीय मदत मंजूर…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे शिराळे फटाका कारखाना स्फोट प्रकरणातील मयत व्यक्तींच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे २५ लाख रूपये शासकीय मदत मंजूर.. बार्शी तालुक्यातील शिराळे येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन या दुर्दैवी घटनेमध्ये ५ महीलांचा मृत्यू झाला होता. या मयतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी आमदार राजाभाऊ राऊत यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता,त्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मयत वारसांच्या कुटुंबास प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे २५ लाख रुपये मंजूर केले आहेत.संकटाच्या काळात मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कुटुंब प्रमुख म्हणून उभे राहिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.