ग्रंथमित्र कै.कांतीलाल साळुंखे यांच्या कुटुंबियांना बार्शी तालुका ग्रंथालय संघटनेकडून आर्थिक मदत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : माढा येथील शिवलाल शहा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल ग्रंथमित्र कांतीलाल दत्तू साळुंखे यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झालेले आहे, घरातील एकमेव कमवता माणूस गेला तसेच त्यांच्या कुटुंबियांची अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने एक सामाजिक भावना व ग्रंथालय चळवळीची बांधिलकी याच भावनेने व अशावेळी शासनाकडून कुठलाही ठोस निधी,या क्षेत्रातील कर्मचारी यांना पेन्शन वा प्रोविडेंट फंडही मिळत नाही त्यामुळे या कुटुंबाला आधार देण्यासाठी समस्त बार्शी तालुका ग्रंथालय चळवळीच्या वतीने जिल्हा संघाचे संचालक विनोद गायकवाड यांनी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील अनेक मार्गदर्शक तसेच सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ग्रंथप्रेमी सी. बी. गंभीर सर, ग्रंथमित्र ॲड. अनिल पाटील, तालुकाध्यक्ष सुरेशनाना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त बार्शी तालुका सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या वतीने कै. कांतीलाल साळुंखे यांच्या कुटुंबियांना रोख रु.४३०००/- मदतनिधी त्यांच्या कुटुंबियांनाकडे सुपूर्द केला व त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवलाल शहा वाचनालयाचे अध्यक्ष हणमंतराव परबत सर,जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे, बार्शी तालुका चळवळीचे रामभाऊ वाघमोडे, मोहोळचे सलगर, माढा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रविंद्र परबत, पदाधिकारी तुकाराम भाकरे सर, अमर परबत सर, शहाजी भुसारे,अरुण लोंढे सर, अशोक लोकरे सर, श्रीमती छाया आखाडे यांचेसह माढा तालुक्यातील बहुसंख्य वाचनालयाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मचारी बांधव आदीजन उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या