धाराशिवमहाराष्ट्र

दुष्काळाच्या काळोखात शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश ! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने जिल्ह्यातील दोन लाख कुटुंबांना होणार दिवाळी शिधा वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क500

धाराशिव दि.३१ आक्टोबर : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील ‘दिवाळी शिधा’ मदत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख कुटुंबांना दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्याचे वाटप २ व ३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सहकार्य केले. शिध्यामध्ये साखर,मैदा,रवा,बेसन, डालडा, पणत्या, उटणे, लक्ष्मीची पावले आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका यांचा समावेश आहे.500२ नोव्हेंबर रोजी तामलवाडी, येणेगुर आणि उत्तर जेवळी येथे, तर ३ नोव्हेंबर रोजी पळसप, येडशी,येरमाळा आणि पारगाव येथे दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमांना मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती राहून शेतकरी कुटुंबाशी संवाद साधणार आहेत.

पालकमंत्री मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,शेतकऱ्यांच्या घरातील चूल विझू नये,त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवू नये आणि दुष्काळातही त्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये,यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच त्यांच्या मनात जगण्याचा विश्वास निर्माण करणे हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button