बार्शीशैक्षणिक

शाह कन्या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गरज ही शोधाची जननी आहे त्यामुळे विज्ञान विषयातील उपक्रमात विद्यार्थिनीनी सहभाग घेतल्यास उत्तम संशोधक तयार होतील असे विचार प्रताप दराडे यानी शाह कन्या प्रशालेतील विज्ञान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडले .कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे होत्या. भारतीय शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण, व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक संदेश घाडगे यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी संशोधक व त्यांनी लावलेले शोध ,वैज्ञानिकांच्या जीवन चरित्रा बद्दल माहिती सांगितली. विद्यार्थिनींनी विज्ञान विषयातील विविध प्रयोगांची मांडणी केली होती या प्रयोगांचे परीक्षण प्रमुख पाहुण्या शुभदा जोशी यांनी केले ,प्रश्नमंजुषा विज्ञाना मधील आकृत्या काढणे आरोग्य तपासणी ,इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख उषा वीर ,आयुब शेख महेश काळे उज्ज्वला स्वामी सर्व शिक्षक व विज्ञान मंडळातील सर्व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन रवी पोरे यांनी केले सुत्रसंचालन कु सुरक्षा जाधव व कु समृद्धी बरिदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button