विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
उद्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर : शंकर ( दादा ) वाघमारे
बार्शी : विश्वरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भीम टायगर संघटनेच्या वतीने मोफत दंत, मुख आणि मोफत बाल आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. असल्याची माहिती भिम टायगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर (दादा) वाघमारे यांनी माहिती दिली. या शिबिरात बालरोग तज्ञ डॉक्टर अमित इंगळे, दंतरोग तज्ञ डॉक्टर विनोद व डॉक्टर सोनाली भालेराव उपस्थित राहणार असून शिबिरात आरोग्याची तपासणी केलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार देखील केला जाणार आहे. तसेच बार्शीतील भगवंत ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले असून हे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी 6 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ कोर्टासमोर होणार आहे.
या शिबिराचा बार्शी शहर व तालुक्यातील सर्व घटकातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन भीम टायगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर (दादा) वाघमारे यांनी केले आहे.