रुक्मिणी मोटे यांची पाथुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
करमाळा : तालुक्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली असून यावेळी रुक्मिणी शितलकुमार मोटे बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी सरपंच पदासाठी रुक्मिणी शितलकुमार मोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी हलगी वाजवत गुलालाची उधळण करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.यावेळी माजी सरपंच अश्विनी मोटे,उपसरपंच प्रकाश खरात,ग्रामपंचायत सदस्य सुनंदा मोटे, आशा तोडेकर,सचिन चांगण,चांगदेव कानडे हे उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के. एस.खारव,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस. पाटील, ग्रामसेवक महेश काळे,पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव,पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर कदम, होमगार्ड रोहिदास लोंढे हे उपस्थित होते.