राजेंद्र कलंत्री आणि रियाज खरादी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज खरादी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे कृषिमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी विशेष पुढाकार घेतला.

राजेंद्र कलंत्री हे सोलापूर शहरातील परिचित आणि अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी उपमहापौरपदाच्या काळात अनेक विकासकामांत सक्रिय भूमिका बजावली आहे. तर रियाज खरादी हे एमआयएम पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील गटनेते म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामाची शहरात वेगळी ओळख आहे. या दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे सोलापूर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

विशेषतः अल्पसंख्यांक समाजासह सर्वसामान्य मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.पक्ष प्रवेशानंतर उपस्थित नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर, सोलापूर शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यावर आणि येणाऱ्या काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येईल, असे संकेत दिले. या कार्यक्रमाला मुंबईसह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात चांगलीच हालचाल निर्माण झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या