विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप
शिवाजीनगर : विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करताना प्रवीण बढेकर
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था’ तसेच ‘मिराकी इव्हेंट्स’ यांच्या वतीने ‘बढेकर ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर येथील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या डॉ. आपटे वसतिगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप मंगळवार (ता. १६) रोजी करण्यात आले.
यावेळी प्रवीण बढेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “जे काही कराल ते प्रामाणिकपणे आणि कष्टाने करा. मदत करून ती विसरून जाणे, या मताचा मी आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्न करूया. आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवले की, कमावलेल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम सामाजिक भान म्हणून समाजकार्याकरिता खर्च करावी. सामाजिक कार्य करत असतानाच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.”
‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे’ संस्थापक अध्यक्ष समाधान काटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्ते उमेश वाघ तसेच समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला समितीचे मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक रणजित बोत्रे तसेच ‘मिराकी इव्हेंट्स’च्या संचालिका स्वाती पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रेरणा मालुसरे आणि श्रावणी घोलप या विद्यार्थिंनी सूत्रसंचालन करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.




