वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; श्रीपतपिंपरीत दुर्दैवी घटना
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बाळासाहेब तानाजी गरदडे (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे आण्णा वस्ती परिसरातील गट क्रमांक ७३/२ मध्ये ते पावसापासून बचावासाठी आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. दुपारी सुमारे ४.४५ ते ५ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात झाडाखाली थांबू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.




