अभिनयाची आवड असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी बार्शीत “अमर चित्रवाणी” आयोजित ॲक्टिंग वर्कशॉप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी ‘अमर चित्रवाणी’ तर्फे विशेष ॲक्टिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेते व प्रशिक्षक अमर देवकर आणि सहशिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्कशॉप पार पडणार असून अभिनयाची मूलभूत तत्त्वे, अभिव्यक्ती कौशल्य, विविध अभिनय प्रकार तसेच प्रत्यक्ष शूटिंगचा अनुभव सहभागी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
चित्रपट, मालिका, शॉर्ट फिल्म आणि रंगभूमी क्षेत्रात काम करण्याची तयारी करणाऱ्या नवोदितांसाठी हे वर्कशॉप उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेमध्ये अभिनयातील बारकावे, संवादफेक, कॅमेरासमोर वावरणे, शरीरभाषा आणि सीन सराव यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षक अमर देवकर यांनी “म्होरक्या”, “फुला”, “प्रिझम” यांसारख्या चित्रपटामध्ये अभिनय केला असून त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. कारण देवकर यांचे काही विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत तर अनेक विद्यार्थी आज चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात नावलौकिकास आले आहेत.
ही कार्यशाळा २७ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. बार्शी येथील मेडप्लस मेडिकलच्या वर, तिसरा मजला, संकेश्वर बागेसमोर, बार्शी इथे वर्कशॉप होणार आहे. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.





