बार्शी तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरची कारवाई, सौंदरे येथे तब्बल १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा वाहनासह मुद्देमाल जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण पथकाने बार्शी उपविभागात अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सौंदरे परिसरातून देशी-विदेशी दारूचा साठा, वाहन व मोबाईल असा एकूण १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अमित अशोक तुपेरे (वय ३२, रा. खंडोबा मंदिराजवळ, सौंदरे ता. बार्शी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.50000
दि. ११ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी समर्थ गाजरे, सपोनि भिमगोंडा पाटील, पोका सागर ढोरे पाटील, पोका यश देवकते व चापोका दिलीप थोरात हे बार्शी उपविभागात अवैध धंद्यांवर कारवाई व पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मौजे सौंदरे परिसरात बार्शी-सोलापूर रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी ओमनी वाहनातून अवैधरित्या दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत सापळा रचला. काही वेळात संशयित ओमनी वाहन येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता विविध कंपनीच्या बिअर व व्हिस्कीच्या बाटल्या मिळून आल्या.
5000
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये बडवायझर, किंगफिशर बिअर, ढोकी संत्रा देशी दारू, रॉयल स्टॅग व कासीक गोल्ड व्हिस्कीच्या बाटल्यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत ४९ हजार ९२० रुपये इतकी आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी ओमनी व एक व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा अतिरिक्त मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाईदरम्यान पंचनामा करून प्रत्येक कंपनीच्या बाटल्यांचे नमुने सीए तपासणीसाठी वेगळे सीलबंद करण्यात आले आहेत. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

बार्शीत अवैध धंद्यांवर एलसीबीच्या कारवाया स्थानिक पोलीस प्रशासनाचे अपयश

दरम्यान बार्शी शहर व तालुक्यात अवैध धंद्यांवर स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यात अपयशी असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण मागील महिनाभरात बार्शी शहर व तालुक्यात एलसीबी कडून अवैध धंद्यांवर मोठ्या कारवाया झालेल्या आहेत. अवैध दारू, गुटखा, मटका,गांजा आदी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी बार्शी शहर व तालुक्यात येऊन कारवाया केलेल्या आहेत. पण स्थानिक पोलीस प्रशासन अशा अवैध धंद्यांवर धडकपणे कारवाई करताना दिसून येत नाही.5090

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या