छत्रपती ग्रुपचा सामाजिक आदर्श: निराधार बालिकेच्या भविष्यासाठी ११,०४४ रुपयांची मुदत ठेव!

0

​विजयसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम; भगवंत मल्टीस्टेट बँकेत केली एफडी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : छत्रपती ग्रुपचे सदस्य बाळा शिंदे यांचे मोठे बंधू बुद्धवासी शिरीष दशरथ शिंदे यांचे सहा ते सात महिन्यापूर्वी दुखद निधन झाले असून त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर पसरला होता अत्यंत हलाखीची परिस्थिती घरची असल्याकारणाने बाळा शिंदे यांच्या वहिनी चैताली शिरीष शिंदे या अक्षरशः रानामध्ये काबाड कष्ट करून आपल्या दोन मुलांचे संगोपन करत होते हे लक्षात आल्याने छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेऊन बुद्धवासी सिरीज दशरथ शिंदे यांची मुलगी कु.अनुष्का शिरीष शिंदे हिच्या नावाने एफडी करण्याचे नियोजन केले व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व छत्रपती ग्रुपचे आधारस्तंभ मार्गदर्शक विजयसिंह बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कु.अनुष्का शिरीष शिंदे हिच्या नावे आज 11044 रुपयांची एफडी भगवंत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये करण्यात आली.50000
त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच खर्च एखाद्याच्या उपयोगी येण्याच्या माध्यमातून आज ही एफडी करण्यात आली तसेच या एफ डी पाठीमागचे उद्देश म्हणजे भविष्य काळामध्ये या दीदीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नाच्या कामी या पैशाचा उपयोग व्हावा या उद्देशाने ही एफडीआज करण्यात आली.
5000या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती ग्रुप चे मार्गदर्शक खंबीर पाठीराखे नगरसेवक विजय नानासाहेब राऊत आमचे मोठे बंधू माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील छत्रपती ग्रुपचे हितचिंतक डॉक्टर गणेश सातपुते पत्रकार आबासाहेब बारबोले पत्रकार चंद्रकांत करडे पत्रकार विजय कोरे छत्रपती ग्रुप चे सचिव बापूसाहेब पवार आमचे मार्गदर्शक किरण कोकाटे जय शिवराय प्रतिष्ठान अध्यक्ष विजय राऊत Adv गणेश हांडे अंकुश नान्नजकर उडान फाउंडेशनचे शकील भाई मुलांनी अमोल डिसले तानाजी नवले अजित कदम अमर लोमटे सावंत मालक जाफर शेख अनिल दळवी सर यांच्या हस्ते आज एफडी पत्र कु.अनुष्का शिरीष शिंदे व छत्रपती ग्रुपचे सदस्य बाळा शिंदे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.5000 कार्यक्रमाप्रसंगी अमोल पाटील दत्ता मुकटे
नागेश मोहिते रोहित मोहिते अखिल पठाण मयूर पवार सागर थोरात कोमल लाड दिनेश सदाफुले विजय चव्हाण समाधान राऊत राहुल असवदे रवी मस्के भगवान जाधव प्रवीण पिचके गोविंद थोरात नागेश जाधव रोहन भगत अभिजीत चव्हाण पृथ्वीराज पाटील गणेश कोल्हे श्रावण भालेराव पिंटू छापेकर रोहित देवकते दत्ता गात सचिन सुपेकर सचिन शिंदे चिकू डाके चिऊ शिंदे बप्पा हुळे मित्रपरिवार उपस्थित होते.
5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या