भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार-मंत्री अतुल सावे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे, दि. १३: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले. सावे यांनी आज भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, पीएमपीएल संचालक तथा नगरसेवक अजय खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.500सावे म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा करुन भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करुन कामाची सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून सध्याची ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत उर्वरित विकास कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.5900यावेळी नायर यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक विकास आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली. इमारतीची वैशिष्ट्ये आणि सुविधा: स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध आधुनिक सुविधा असणार असून यामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘थीम बेस्ड’ ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफीचे काम करण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांचे अर्धपुतळे आणि त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्र आणि संगणक केंद्र उभारले जाणार आहे. स्मारकात एक ॲम्फीथिएटर देखील असणार आहे.509

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या