गुळपोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त गुळपोळी येथे दिमाखदार सोहळा
B1न्यूज मराठी नेटवर्क
भीमगीतांच्या तालावर गाव दणाणले; भीमसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथे विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्ष गटनेत्या संघमित्रा चौधरी व काळूराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संघमित्रा चौधरी यांचे स्वागत वैशाली चौधरी व शीतल गायकवाड यांनी केले.
मिरवणुकीचे उद्घाटन संघमित्रा चौधरी व काळूराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अॅड. विवेक गजशिव, कृष्णा चौधरी, इंद्रजित चिकणे, अमोल नरखडे, शिरीष चिकणे, अशोक चिकणे, बापू राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही भव्य मिरवणूक भीमनगर, बस स्टँड, ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर व विविध चौकातून काढण्यात आली. भिमगीतांच्या तालावर भीमसैनिकांनी जल्लोषात नृत्य करत वातावरण दणाणून सोडले. सजवलेल्या बग्गीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्लू स्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष समाधान चौधरी, खजिनदार अर्जुन चौधरी, सचिव धनाजी चौधरी अतुल चौधरी , रणजित चौधरी, सचिन चौधरी , सुनील चौधरी , अमित चौधरी , कृष्णा चौधरी, लखन चौधरी , राहुल चौधरी, आनंद गायकवाड, अजय चौधरी, मोहन चौधरी, तानाजी चौधरी व इतर भीमसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.
वैराग पोलीस स्टेशनचे अमोल कांबळे हेड कॉन्स्टेबल , बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे अमित घाडगे, उत्तम चौधरी यावेळी उपस्थित होते.




