श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : गुळपोळी येथे श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणयात आली. यावेळी वाचनालयाच्या अध्यक्षा राणी गणेश काळे माळी यांनी प्रतीमेचे पुजन केले व महात्मा फुले यांचे विचार शिका अन्याया विरूध संघर्ष करा असे महात्मा फुले यांचे विचार मांडले, सर्वांना पेढे वाटण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थित वाचनालयाच्या अध्यक्षा राणी गणेश काळे, सुनिता राजेंद्र चिकणे, शंकुतला खेलबा मोटे, सुनिता लहू चिकणे, सुमन ज्ञानदेव गोरे ,सुरेखा ढगे, शिवाजी सूर्यकांत चिकणे, वंदना दत्तात्रय काळे क्रांति ज्योतीच्या ग्रामसंघाच्या सचिव उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाला उपस्थिततांचे आभार ग्रंथपाल रेखा सूर्यकांत चिकणे यांनी आभार मानले.