गुळपोळी येथे श्री भैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशपूजन सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्कबार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशपूजन सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज रामविजय पारायण आयोजन करण्यात आले आहे.
सर्व भाविक भक्तांनी ज्ञानदानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले. १३ एप्रिल २०२२ कलश मिरवणूक दुपारी ३ वाजता व्यासपीठ अधिष्ठता ह. भ. प. केशव सावता माळी महाराज संपन्न होणार आहे .
१४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १ वाजता श्री भैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशपूजन सोहळा सद् गुरू पिर योगी शामनाथ महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
पुढील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा , सकाळी ८ ते १२ रामविजय पारायण , १२ ते १२: ३० आरती , दुपारी १ ते २ भोजन , दुपारी ५ ते ६ प्रवचन , सायं ६ ते ७ हरिपाठ , ७ ते ९ जेवन , रात्री ९ ते ११ हरिकिर्तन , ११ ते ४ हरिजागर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
८ एप्रिल ह. भ. प. सविताताई केदार ( पुणे ) ९ एप्रिल ह. भ. प. गरवारे महाराज (सिध्देश्वर कुरवली ता सातारा ) १० एप्रिल ह. भ. प. बोराडे महाराज ( परांडा ) ११ एप्रिल ह. भ. प. राधिकाताई वीर ( नाशिक ) १२ एप्रिल ह. भ. प. चंद्रकांत जाधव ( पुणे ) १३ एप्रिल ह. भ. प. ॲड. पांडुरंग लोमटे ( उस्मानाबाद ) १४ एप्रिल ह. भ. प. नवनाथ साठे महाराज ( परांडा ) १५ एप्रिल ह. भ. प. नवनाथ साठे महाराज (परांडा ) यांचे काल्याचे किर्तन होईल. सर्व कीर्तनाचा लाभ भाविकभक्तांनी घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले.