शिखर शिंगणापुरात ‘हरहर महादेव’च्या जयघोषात शिव-पार्वती हळदी सोहळा संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेत बुधवारी शिव-पार्वती हळदी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

शिखर शिंगणापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस प्रारंभ झाला आहे. बुधवारी सनईचौघड्यांच्या सुरात, हरहर महादेवच्या जयघोषात शिव-पार्वती हळदी समारंभ पार पडला. हळदी सोहळ्यासाठी वधु-वरांकडील बडवे , जिरायतखाने , मानकरी, सेवाधारी यासह भाविकभक्त उपस्थित होते.
गेली दोन वर्षे शंभू महादेव यात्रेवर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे सलग दोन वर्षे शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात आली होती. यात्रोत्सवातील पारंपारिक धार्मिक विधी स्थानिक सेवाधाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. यावर्षी प्रशासनाने शंभू महादेव यात्रेस परवानगी दिल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी सहाच्या सुमारास शंभू महादेवाच्या मंदिरात शिवपार्वती हळदी सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. वधू-वरांकडील बडवे, जिरायतखाने मानकऱ्यांच्या हस्ते शिवलिंगास हळद लावण्यात आली.
यावेळी शिवपार्वती व विष्णूलक्ष्मी शिवलिंगास विधीवत पूजा करुन हळद लावून कोरोनाचे जागतिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. हळदी सोहळ्यासाठी दहिवडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक ओंकार देशपांडे यांच्यासह बडवे, जंगम, पाटील, चौधरी, शेटे, साळी, दांगट, गुरव, कोळी, घडशी आदी मानकरी व सेवाधारी उपस्थित होते. तर दोन वर्षाच्या कालावधीनंतर भाविकांच्या उपस्थितीत हळदी सोहळा उत्साहात पार पडला. यात्रेत शनिवारी शिवपार्वती विवाहसोहळा होणार आहे. यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी यात्रा परिसराची पाहणी करुन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना यात्रेसाठी सतर्क राहण्याच्या सूचना
दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या