नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना कोविड योध्दा पुरस्कार प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नागपूर : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या वतीने नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना जाहीर झालेला कोविड योध्दा राज्यस्तरीय पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी आज येथे सन्मानपूर्वक प्रदान केला.
कोरोना महामारीच्या पहिल्या दिवसापासून कोरोना विरुद्धच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी बजाविलेल्या शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि व्यक्ती अशा तीन विभागातील प्रत्येकी दहा मान्यवरांना कोविड योध्दा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करुन त्यांच्या गौरव संघटनेच्यावतीने करण्यात आला.शासकीय अधिकारी विभागातून कोविड विरोधातील लढ्यात विशेष कामगिरी करुन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूरकरांना दिलासा दिला होता व महाराष्ट्राच्या या कार्यात मोठे योगदान दिले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या