गणेश लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बिस्लरी वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
कोरफळे : येमाई देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत बिस्लरी वाटप
बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील येमाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. येमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येतात. कोरफळे येथे येमाई देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम असतात. यावर्षी पाच दिवस यात्रा सुरू राहणार आहे.
भाविकांची गैर सोय होऊन नये म्हणून विविध मंडळा कडून मोफत पाणी वाटप केले जाते. यावर्षी गणेश लंगोटे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याची बिस्लरी मोफत देण्यात आली. विविध मान्यवरांच्या हस्ते पाणी बिस्लरी देण्यात आली. भाविक भक्तांनी यांचा लाभ घेता असून अनेकांनी आभार आणि कौतुक व्यक्त केले.
वाढदिवसाचा इतर खर्च न करता गणेश लंगोटे यांनी यात्रेला येणाऱ्या भाविक भक्तांना पाण्याची सोय केली.
सर्वांनी आपले वाढदिवस हे सामाजिक उपक्रम ठेवून आपले वाढदिवस साजरा करा असे गणेश लंगोटे यांनी सांगितले आहे.
त्यावेळी महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी , उपाध्यक्ष रणजित चौधरी ,गणेश लंगोटे , विष्णू शिंदे , अर्थव चौधरी , समाधान चौधरी , सुनिल चौधरी , पांडुरंग चौधरी , लखन चौधरी , बाबू भाले , औदुबर सावंत , नागेश शिंदे , अक्षय सावंत , गणेश लंगोटे मित्रमंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.