पाडव्यानिमित्त मधुबन ट्रॅक्टर्समधून १०१ जॉन डिअर ट्रॅक्टर्सचे वितरण ; संचालक प्रवीण कसपटे यांची माहिती

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील जॉन डिअर मधुबन ट्रॅक्टर्सचे संचालक प्रवीण कसपटे यांनी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १०१ जॉन डिअर ट्रक्टर्सचे विक्री होणार असल्याचे सांगितले.यावेळी कसपटे यांनी बोलताना सांगितले की , आमच्या ट्रॅक्टर्सचा खप वाढण्याचे कारण कमीत कमी व्याजदार,जॉन डिअर या कंपनीचे स्वतः चे फायनान्स असल्याने अत्यल्प व्याजदरात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्याकरिता कर्ज मिळत आहे. ट्रॅक्टर सोबत जॉन डिअर कंपनीचा नांगर व अवजारे फ्री दिले जात आहेत.काही ट्रॅक्टर पाडव्या निमित्त विशेष ऑफरमध्येही दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर्स घेण्याची यानिमित्ताने सुवर्ण संधी लाभली आहे.
या कार्यक्रमासाठी जॉन डिअर इंडियाचे डायरेक्टर कॉर्पोरेट अफेअर्स मुकुल वर्शने,झोनल बिझनेस मॅनेजर राजेश लिंगमपल्ली,महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर अंकित सक्सेना, असिस्टंट ऐरीया मैनेजर कैलास तासकर आदी या कार्यक्रमासाठी येणार आहेत.येथे होणार जॉन डिअर मधुबन ट्रॅक्टर्सचे वितरण
बार्शी लातूर रोड, उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, नळदुर्ग,भूम, परंडा,वाशी, कळंब, ढोकी, वैराग