शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी महाविस्तार AI ॲपचा वापर करा – जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि. 15 : हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा,” असे आवाहन शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी केले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले की, हे ॲप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.

ॲपची वैशिष्ट्ये:

AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो.

स्थानिक हवामान अंदाजामुळे पेरणी, कापणी व खतांचा वापर यांचे नियोजन शक्य होते.

बाजारभावाची रिअल टाइम माहिती उपलब्ध होते.

कृषी योजनांचे तपशील, अनुदान व विमा योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते.

मराठीत व्हिडिओ मार्गदर्शनाद्वारे लागवड, खतांचा वापर, कापणी व जैविक शेतीचे मार्गदर्शन मिळते.

पिकांचे फोटो अपलोड करून रोग व किडींचे निदान करून उपाय मिळवता येतो. सोलापूर जिल्ह्यातील प्रगती:

आजपर्यंत ९२,५८७ शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड करून नोंदणी केली आहे.

राज्यात सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील वहितीखालील खातेदारांच्या २०% प्रमाणात ॲप नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मौजे अकोले खु, ता. माढा हे गाव राज्यातील पहिले १००% डिजिटल कृषी माहिती तंत्रज्ञान वापरणारे गाव ठरले आहे.

बार्शी व माढा तालुके अनुक्रमे राज्यात चौथ्या व दहाव्या क्रमांकावर आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या