आंबा, काजू आणि उर्वरित महाराष्ट्रातील संत्रा पिकासाठी फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड-अलिबाग : आंबा फळपिका करिता प्रति हे. रक्कम रु. 14 हजार 450/- व काजू फळपिका करिता प्रति हे. रक्कम रु. 6,000/-इतका विमा हप्ता आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षासाठी अतिरिक्त विमा हप्ता आंबा फळपिका करिता रक्कम रु. 4,845/- व काजू फळपिका करिता रक्क्म रु.2,000/- तरी विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक, CSC सेंटर, किंवा पीक विमा पोर्टल https://pmfby.gov.in, येथे सुविधा उपलब्ध आहे.
कोकण विभागातील आंबा, काजू आणि उर्वरित महाराष्ट्रातील संत्रा पिकासाठी फळपीक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर, 2025 असा होता. परंतु आता योजनेत भाग घेण्यासाठी केंद्र शासनाने दि.15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, शासनाने आंबा व काजू पिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना दि. 12 जून 2024 च्या शासन निर्णयान्वये सुरु केलेली आहे. रायगड जिल्ह्याकरिता युनिव्हर्रसल सम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. अंधेरी मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरुन ई-पिक पाहणी करुन फळ बागेची नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड, फळ पिकाची बाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र फळ बागेचा Geo Tagging केलेला फोटो व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत, वि.का.स.सेवा सोसायटीत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.
विमा संरक्षण केवळ उत्पादनक्षम फळबागांना लागू राहील यासाठी आंबा पिकाचे उत्पादनक्षम वय 5 वर्ष व काजु पिकाचे उत्पादनक्षम वय 5 वर्ष आहे. योजनेत सहभागासाठी कोकण विभागाकरिता एक फळ पिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10) व जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा हि सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी 4 हेक्टर मर्यादा पर्यंत राहील.
या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधी पर्यंत विमा संरक्षण दिले जाईल, फळपिके- काजू, समाविष्ट धोके अवेळी पाऊस-विमा संरक्षण कालावधी- 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी,, कमी तापमान- विमा संरक्षण कालावधी 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार,गारपीट- विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 30 एप्रिल. विमा संरक्षित रक्कम 40 हजार. विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर, 2025.
आंबा- अवेळी पाऊस विमा संरक्षण कालावधी 1 डिसेंबर ते 31 मार्च, 01 एप्रिल ते 15 में, कमी तापमान 1 जानेवारी ते 10 मार्च, जास्त तापमान 1 मार्च ते 15 में, विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार, वेगाचा वारा विमा संरक्षण कालावधी 16 एप्रिल ते 15 मे, गारपीट 01 फेब्रुवारी ते 31 मे, विमा संरक्षित रक्कम 57 हजार, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर, 2025.




