बार्शी तालुका पोलीसांची कारवाई; 21 वर्षीय युवक पिस्टलसह अटक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने 10 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत एक युवक पिस्टल, जिवंत काडतूस आणि मोटारसायकलसह पकडला आहे. अरबाज जिलाली जमादार (वय 21, रा. संजयनगर, वैराग) असे आरोपीचे नाव आहे.
सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार शेंद्री फाटा परिसरात संशयित हालचाली होत असल्याने पोलिसांनी पथकासह तेथे धाड टाकली. त्यात मोटारसायकलवर संशयितरित्या थांबलेल्या अरबाजची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल, मॅगझिन व जिवंत काडतूस आढळून आले. अंदाजे 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीस अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून या प्रकरणामागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




