अतितीव्र दिव्यांग व्यक्तींनी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड-अलिबाग : सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषदेने 5 टक्के जिल्हा परिषदेस दिव्यांग कल्याण निधीमधून दिव्यांग व्यक्तींसाठी नाविण्यपूर्ण योजना म्हणून “अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे” या योजनेचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेसाठी लाभार्थी निवडी बाबतचे निकष, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे इ. निश्चित करण्यात आल्या आहेत. योजनेसाठी विहित नमुन्यातील फॉर्म तयार करण्यात आलेले असून फॉर्म गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, गाव पातळीवर सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव दि.31 डिसेंबर 2025 पूर्वी गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करावेत,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे सर्व साधारण निकष असतील :- लाभार्थ्यांकडे दिव्यांगात्याचे प्रमाण 60 टक्के किंवा 60 टक्के पेक्षा जास्त असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा. अर्जदाराकडे केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार दिव्यांगत्वाचे फक्त UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. जुने इतर प्रमाणपत्र ग्राहय धरले जाणार नाही. लाभार्थी/दिव्यांग व्यक्ती हा ग्रामीण भागातील व रायगड जिल्हयातील रहिवासी असावा.

(नगरपरिषद/म.न.पा. मधील नसावा), लाभार्थ्यांचे वय 18 वर्ष व त्यापेक्षा जास्त असावे. उत्पन्नाचा दाखला अथवा दारिद्रय रेषेखालील दाखला. (उत्पन्न मर्यादा 1 लाखाचे आत) कुटुंब दारिद्रय रेषेखालील असल्यास ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांचा त्याबाबतचा संयुक्त दाखला, कुटुंब दारिद्रय रेषेखालील नसल्यास उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांच्याकडील आवश्यक आहे. (रेशनकार्ड झेरॉक्स/रहिवाशी दाखला/विद्युत बिलाची झेरॉक्स या पैकी 1) आधार कार्ड झेरॉक्स, बँक खाते पास बुक झेरॉक्स, UDID Card झेरॉक्स इ. सर्व प्रती सोबत जोडाव्यात, लाभार्थी शासकीय/निमशासकीय निवृत्ती वेतन (पेन्शन) धारक कर्मचारी नसावा. Form Down Load Link:- https://divyangkalyan.rzpapps.in/Web/mandate,.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या