महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर | ०६ डिसेंबर २०२५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय समाजातील विषमता दूर करून समानतेचा मार्ग दाखवणारे आणि भारतीय राज्यघटनेद्वारे लोकशाहीची भक्कम पायाभरणी करणारे डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा आजही तेजस्वी आहे. पीडित, शोषित, वंचित समाजाला नवी ओळख आणि आत्मसन्मान देणारी त्यांची देणगी अमूल्य असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
या अभिवादन कार्यक्रमास शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, भटक्या-विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू यांच्यासह शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रा. भोजराज पवार, सुभाष चव्हाण, मधुकर अठवले, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, कुमार बंटी, सागर शहा, लखन गायकवाड, विविध महिला व युवक कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.




