चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना रामदास आठवलेंनी केले विनम्र अभिवादन
तोडणारे तुटतील असे भारताला संविधानातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अतूट जोडले आहे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई दिनांक 6 : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून भारत देशाला असे अतुट जोडले आहे की जे या देशाला तोडू पाहतील तेच तुटून जातील. विविधतेने नटलेल्या भारताला एकजूट ;एकसंघ; अखंड आणि अभेद्य ठेवणारे भारताचे संविधान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिले आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र श्रद्धांजली ना.रामदास आठवले यांनी वाहिली.यावेळी त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले पुत्र जीत आठवले रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; माजी मंत्री अविनाश महातेकर; काकासाहेब खंबाळकर ; हेमंत रणपिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला मानवमुक्तीचा संगर हा संपूर्ण जगात मानवाधिकार चळवळीला प्रेरणा देणारा लढा आहे. एक व्यक्ती एक मत एक मूल्य या तत्वाने भारतात राजकीय समता स्थापन करून सामाजिक आणि आर्थिक समतेचे उद्दिष्ट्य त्यांनी देशाला दिले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारत देशाला घडविणारे विचार आहे.त्यांनी केवळ दलित समुदायाचा उद्धार केला नाही तर सर्व समाज घटकांच्या कल्याणचा विचार करून संपूर्ण भारत देशाचा उद्धार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे.समता ;बंधुता ;सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याचा पाया महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रचला आहे असे सांगत ना. रामदास आठवले यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन केले.




