जवाहर नवोदय विद्यालयप्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.13 डिसेंबर 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक सत्राकरीता सहावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग-इन करावे आणि प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. परीक्षा केंद्रावरील प्रवेशासाठी हे प्रवेशपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आता https://cbseitms.rcil.gov.in/nvs अधिकृत संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
तरी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षक व मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी. तसेच संकेतस्थळावरुन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करावेत. तरी उमेदवारांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या दिवशी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवेशपत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्राचे ठिकाण, वेळेची माहिती आणि सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करावे, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.पवार यांनी केले आहे.




