खेळाडूनी अधिकाधिक पदके महाराष्ट्राला मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील राहावे – हणुमंत पाटील

0

राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा बारामती येथे संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : खेळाडुंनी उत्तम खेळ करून राष्ट्रीय स्पर्धेत अधिकाधिक पदके महाराष्ट्राला मिळतील याकरिता प्रयत्नशील रहावे, खेळाडूनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा खेळाव्यात. अतिशय उत्साहाने स्पर्धेला सामोरे जावे. खेळाच्या अनुषंगाने बारामती येथे खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सॉफ्ट टेनिस या खेळाचा आशियाई खेळामध्ये समावेश करण्यात आला आहे. शासनस्तरावर ५ टक्के आरक्षण देखील असल्याने या खेळात अलीकडच्या काळात चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते, असे मत बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी केले.

क्रीडा युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल पुणे बारामती येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी, बारामती महेश चावले, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष दिपक अरडे, पुणे जिल्हा सॉफ्ट टेनिसचे सचिव विल्सन अँड्रूस,प्रो कबड्डी खेळाडू दादा आव्हाड आदी उपस्थित होते.

विल्सन अँड्रूस यांनी खेळात झालेले बदलाविषयी माहिती दिली. खेळाडूंनी संघभावनेने खेळ खेळावे, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन अँड्रूस यांनी केले.लकडे यांनी प्रास्ताविकात राज्याच्या आठ विभागातून ३०० खेळाडूं, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू हे १० ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत देवास मध्यप्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा निवड होणारा संघ सहभागी होणार आहे. यावेळी निवड समिती म्हणून विल्सन अँड्रूस, प्रशांत रणदिवे, विजय पळसकर यांनी काम पाहिले, असेही श्री. लकडे म्हणाले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू आयेशा इंगवले या खेळाडूंला सन्मानित करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या