दि. 02 व 03 डिसेंबर रोजी मतदान व मतमोजणी कारणास्तव आठवडेबाजार बंद ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि. 28 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मतदान दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी आणि मतमोजणी दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या दोन्ही दिवशी काही नगरपंचायत आणि नगरपरिषद हद्दीतील आठवडेबाजार भरत असल्याचे निदर्शनास आले. मतदान आणि मतमोजणी दिवशी परिसर शांततामय आणि निर्भय ठेवण्यासाठी हे बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(3) तसेच Market & Fair Act, 1862 मधील कलम 5(ग) अन्वये अधिकारांचा वापर करून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील खालील आठवडेबाजारांना दि. 02 व 03 डिसेंबर 2025 रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत :

आठवडेबाजार बंद ठेवण्याचे आदेश

• पंढरपूर नगरपरिषद
मतमोजणी ठिकाण : शासकीय धान्य गोडाऊन, पंढरपूर
• वार : मंगळवार (02 डिसेंबर)

• दुधनी नगरपरिषद
मतमोजणी ठिकाण : दुधनी नगरपरिषद सभागृह
• वार : मंगळवार (02 डिसेंबर)

जिल्हा प्रशासनाने व्यापारी, नागरिक आणि संबंधित सर्वांनी आदेशाचे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या