संविधान दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 111 लोकांचे रक्तदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी,पोलिस अंमलदार व सर्वसामान्य नागरिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आज रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सो, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांचे मार्गदर्शन लाभले. बार्शी शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार, पत्रकार, बार्शी शहरातील सर्वसामान्य नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एकूण 111 जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.




