आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना राज्यस्तरीय ‘झी २४ तास आरोग्य परिषद २०२५’ पुरस्काराने सन्मानित
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना राज्यस्तरीय ‘झी २४ तास आरोग्य परिषद २०२५’ या कार्यक्रमात विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य कल्याण मंत्री प्रकाशजी आंबिटकर, तसेच झी २४ तासचे मुख्य संपादक मा. कमलेशजी सुतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई येथील वाय. बी. चव्हाण सेंटर मध्ये हा भव्य सोहळा पार पडला.
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी आरोग्यविषयक कामात सातत्याने भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, तसेच आरोग्य दूत फाउंडेशन या विविध माध्यमांतून हजारो रुग्णांना आर्थिक मदत, उपचार मार्गदर्शन, हॉस्पिटल समन्वय, आणि आवश्यक वैद्यकीय सहाय्य पोहोचवण्यात आले आहे. समाजातील सर्वसामान्य घटकांपर्यंत आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.
झी २४ तास आरोग्य परिषद २०२५ या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील धोरणे, नव्या संकल्पना आणि सामाजिक आरोग्य उपक्रमांवर चर्चा झाली. याच मंचावर आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.




