उल्हासनगरात भारतीय बौद्ध महासभेचा ३६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
उल्हासनगर : भारतीय बौद्ध महासभा, उल्हासनगर तालुका यांचा ३६ वा वर्धापनदिन उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला राष्ट्रीय नेत्याअंजली आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित राहून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
अंजली आंबेडकर यांनी आपल्या भाषणात महासभेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित समाजभान, शिक्षण आणि संघटन यांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. प्रगतिशील व न्याय्य समाज निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी अँड. एस. के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुषमा पवार, केंद्रीय महिला प्रमुख, बी. एच. गायकवाड, यु. जी. बोराडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विजय गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष, शिला तायडे – ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष, रोशन पगारे – उल्हासनगर तालुका अध्यक्ष, संदीप उबाळे – महासचिव रूपेश हुंबरे – सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते, मनोज पवार – वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष, उज्ज्वल महाले – (उल्हासनगर पदाधिकारी), शेषराव वाघमारे – माजी अध्यक्ष, उल्हासनगर, तालुका अध्यक्ष रोशन पगारे व महासचिव संदीप उबाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
परिसरातील बौद्ध बांधव, महिला, विद्यार्थी व युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. समाजएकता, बौद्ध विचार आणि संघटनशक्ती यांचा संदेश देत भारतीय बौद्ध महासभेचा ३६ वा वर्षपूर्ती सोहळा प्रेरणादायी ठरला.




