अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती २०२५ :कळंब प्रकल्प ५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव दि.२५ नोव्हेंबर : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) कळंब अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांसाठी सरळसेवेने (by nomination) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.संबंधित गावातील स्थानिक पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २४ नोव्हेंबर २०२५ पासून स्वीकारले जात असून,अर्ज भरायची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२५ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. अर्ज भरण्यानंतर त्याची प्रिंट काढून एक प्रत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,कळंब येथे कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे.
कळंब प्रकल्पातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण १६ रिक्त जागांसाठी भरती होत आहे. यामध्ये बारातेवाडी येथे २,देवळाली, मंगरूळ, मलकापूर व रत्नापूर येथे अंगणवाडी सेविका तर आथर्डी, बोरगाव, इटकुर, करंजकल्ला, खामसवाडी, निपाणी, बांगरवाडी, पानगाव, परतापुर व उमरा येथील मदतनीस पदासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे,
किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.संबंधित पदासाठी स्थानिक रहिवासी महिला असणे बंधनकारक आहे.वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे,विधवा उमेदवारांसाठी ४० वर्षे आहे. जास्तीत जास्त दोन हयात अपत्य.जात, रहिवास,शैक्षणिक प्रमाणपत्रे यांसह सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे.
ज्याठिकाणी इतर भाषिक मुले ५० टक्केपेक्षा जास्त असतील,त्या ठिकाणी संबंधित भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अंतिम गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती आदेश देण्यात येणार असून,रुजू न झाल्यास किंवा पद रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल. प्रतीक्षा यादी एक वर्ष वैध राहणार आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, कोणत्याही मध्यस्थाच्या भ्रमात न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.तसेच, भरतीदरम्यान दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.




