बार्शी ते कोल्हापूर हायकोर्ट बस सेवा उद्यापासून शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बार्शी ते कोल्हापूर या हायकोर्ट बस सेवा उदया शनिवार दि. 22 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता बार्शी बसस्थानक येथे शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बार्शी आगार व्यवस्थापक श्रीमती मधुरा जाधवर- दराडे यांनी दिली. बार्शी शहर व परिसरातील नागरिकांना कोल्हापूर येथे हायकोर्ट कामाला जाणाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे.
त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. सदर बस उद्या पासून सकाळी 6 वाजता व दुपारी 2 वाजता या वेळेत सुरु करण्यात आली असून बार्शी बस स्थानकातून सकाळी 6 वाजता ही बस निघणार असून कुर्डूवाडी, पंढरपूर, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले मार्गे कोल्हापूरला दुपारी 12 वाजता पोहोचेल तसेच बार्शीला येताना कोल्हापूर ते बार्शी ही बस कोल्हापूर, मधून दुपारी 2 वाजता निघेल ही बस ,हातकणंगले,जयसिंगपूर,मिरज, पंढरपूर,कुर्डूवाडी मार्गे बार्शीला रात्री 8 वाजता पोहोचेल.
दुपारी 2 वाजता ही बस निघणार असून कुर्डूवाडी,पंढरपूर, मिरज,जयसिंगपूर,हातकणंगले मार्गे कोल्हापूरला रात्री 9 वाजता पोहोचेल तसेच बार्शीला येताना कोल्हापूर ते बार्शी ही बस कोल्हापूर, मधून सकाळी 6 वाजता निघेल ही बस ,हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी मार्गे बार्शीला दुपारी 1 वाजता पोहोचेल. बार्शी – कोल्हापूर या नवीन हायकोर्ट बससेवेचा सर्व प्रवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन बार्शी आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.




